गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या रोहिणी ताकवले यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सत्कार !!
पुणे : वडिलांच्या मायाने थकलेल्या वृद्धांना आधारदेणाऱ्याआनंदी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका रोहिणी ताकवले यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रम, मंगळवार, दि. 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार असून सत्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘बाबा’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात बंडा जोशी, प्रभा सोनवणे, हेमंत केतकर, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, रुपाली अवचरे, वासंती वैद्य, डॉ. ज्योत्स्ना रहाळकर, नंदिनी चांदवले, तनुजा चव्हाण, मृणाल जैन, डॉ. मिलिंद शेंडे, निरुपमा महाजन यांचा सहभाग असणार आहे, असे रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मैथिली आडकर यांनी सांगितले.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात