गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मनिषा निश्चल यांना वसंत कला गौरव पुरस्कार जाहीर !!
पुणे : सी. के. पी. फॅमिली पब्लिक ट्रस्ट, पुणे आणि पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा पहिला वसंत कला गौरव पुरस्कार आघाडीच्या गायिका मनिषा निश्चल यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे दिली.
मनिषा निश्चल
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वर्षीपासून वसंत कला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मनिषा निश्चल या मेहेक संस्थेतर्फे संगीत क्षेत्रांत 15 वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी पाच हजारांहून अधिक संगीत कार्यक्रम सादर केले आहेत. पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शैला दातार यांच्या हस्ते होणार आहे.
वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून या निमित्ताने ‘तीन वसंत’ (पवार, प्रभू, देसाई) हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार, दि. 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. सी. के. पी. परिवारातील कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
जाहिरात