गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्राजक्ता वेदपाठक यांना जाहीर !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कारासाठी प्रसिद्ध कवयित्री, गझलकार, शायरा प्राजक्ता वेदपाठक यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. 29 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
प्राजक्ता वेदपाठक
मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ गझलकार, कवी रमण रणदिवे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. अभिनेते, दिग्दर्शक आणि भाऊसाहेब पाटणकर यांचे नात जावई किरण यज्ञोपवित तसेच पत्रकार, कवी नितीन केळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात मीरा शिंदे, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, प्रज्ञा महाजन, मिलिंद शेंडे, स्वप्निल पोरे, निरुपमा महाजन, सुजाता पवार, वैजयंती आपटे, सुजित कदम, रुपाली अवचरे यांचा सहभाग असणार आहे.
जाहिरात