गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्य परिषद कोथरूड शाखेतर्फे रविवारी उभारणार सांस्कृतिक कलावंत गुढी !
वंदना गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे यांची उपस्थिती !!
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे रविवार, दि. 30 मार्च रोजी सांस्कृतिक कलावंत गुढी उभारली जाणार आहे. मराठी नववर्ष आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे.
गुढी पूजन ‘कुटंब कीर्तन’ या नाटकातील कलाकार सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष समीर हंपी, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.