गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विश्वनाथबाबा पाचवा प्रतिष्ठापना दिन उत्साहाने साजरा !!
पुणे (प्रतिनिधी )सालाबाद प्रमाणे या वर्षीही “साई-विश्वनाथ दरबार”, गंगाधाम येथे प.पू. सदगुरु श्री.विश्वनाथबाबा पाचवा प्रतिष्ठापना /वर्धापन दिन या मंदिरात उत्साहाने साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिना निमित्त विविध अध्यात्मिक/धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहाटे अभिषेक ,सकाळची आरती,भजन,आरती व महाप्रसाद याचा समावेश होता.भाविकांच्या सोईसाठी संध्याकाळी देखील भजन,आरती,महाप्रसाद व शेज आरती चे नियोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सर्व भाविकांनी सदगुरु प.पू.विश्वनाथबाबा मुर्ती व सदगुरु संतनाथबाबा पादुका दर्शन घेतले.
याप्रसंगी गुरु माऊली आईमाता श्रीमती नीताजी संतोष रांका यांनी सर्व भाविकांना नमस्कार करुन आशिर्वाद दिले.भजन कार्यक्रमात प्रामुख्याने शिवसहाय सिंह बनारसवाले ,लवकुश गुप्ता उर्फ एलके,सागर भंडारी ,प्रणव रांका,शुक्ला पंडीत यांनी सहभाग घेतला.
तर प्रचार -प्रसार कार्य अध्यात्म ज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांनी सांभाळले.विविध ठिकाणाहुन आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.