गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला 1 सप्टेंबर पासून सुरवात , 33 संघांचा सहभाग !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धा दि. 1 ते दि. 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत 11.30 वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे होणार आहे.
ह्या वर्षी 33 संघांनी सहभाग घेतला असून पारितोषिक वितरण समारंभ 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.
विजय पटवर्धन फाऊंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा, प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आणि निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून अडचणीत सापडलेल्या कलाकारांना मदतही उपलब्ध करून दिली आहे.
प्रकाश इनामदार स्मृती एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता भरत नाट्य मंदिर पुणे येथे होणार आहे.
जो निधी जमा होईल त्याचा विनियोग अडचणीत अडकलेल्या कलाकारांच्या मदतीसाठी केला जाणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास 25 हजार रुपये व करंडक, द्वितिय क्रमांकास 20 हजार रुपये व करंडक, तृतीय क्रमांकास 15 हजार रुपये व करंडक असे बक्षीस देण्यात येणार आहे
जाहिरात
जाहिरात