गोल्डन आय न्युज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या जिद्द पुरस्काराने संजय सातपुते यांचा होणार गौरव !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे दरवर्षी कर्तृत्ववान व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या जिद्द पुरस्कारासाठी संजय सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.
सातपुते यांनी गेल्या 25 वर्षांत समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझिम पथकाच्या माध्यमातून एक कोटी 25 लाख रुपये समाजऋण फेडण्यासाठी विविध घटकांना प्रदान केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सातपुते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
संजय सातपुते
पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवार, दि. 18 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, वैजयंती आपटे, केतकी देशपांडे, सुजित कदम, नचिकेत जोशी, समीर गायकवाड, योगेश काळे, भारती पांडे यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगित
_________________________________________
जाहिरात