गोल्डन आय न्यूज नेटवर्क वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे, पुणे
प.पु,सद्गुरु श्री.प्रल्हाद महाराज (रामदासी) संस्थान, साखरखेर्डा यांचा पुणे विभागात विविध ठिकाणी ‘आधिकमास पाद्यपूजन’ दौरा दि. १९ जुलै २०२३ ते दि.१० आॕगष्ट २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या कालावधीत विविध कार्यक्रमांचेही आयोजन आहे.श्री दर्शनाचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
श्री.गो.रा.स.स.श्री. प्रल्हाद माहाराज (रामदासी)संस्थान, साखरखेर्डा, जि. बुलढाणा च्या वतीने ‘आधिकमास पाद्यपूजन” दौऱ्याचे आयोजन दि.१९ जुलै २०२३ ते दि.१०आॕगष्ट२०२३ कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातही करण्यात आले आहे.
या आधिकमास दौऱ्यात श्री महाराजांच्या पादुकाचे पूजन , अभिषेक , महाआरती , सायंउपासना, शेजारती , व काकड आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन आहे. श्री महाराजांच्या दौऱ्यात सुसुत्रता असावी या करिता या दौऱ्याचे नियोजन करण्याची सेवा स्थानिक उपासना मंडळाला दिलेली आहे. या आधिकमास पाद्यपूजा दौरा विभागवार तारखा व वेळापत्रक त्या त्या भागातील वेळापत्रक माहिती एक दिवस अगोदर ग्रुप (समुह)वर देण्यात येईल.
तरी या पुणे विभागातील परिसरातील सर्व भक्तांनी श्री दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.असे’रामदासी बाणा’ पुणे या श्री महाराजांच्या उपासना मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
जाहिरात