Marathi FM Radio
Monday, January 13, 2025

ई-वीक सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव : दीपक शिकारपूर !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

ई-वीक सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव : दीपक शिकारपूर

गरवारे महाविद्यालयात ई-वीकचे आयोजन !!

पुणे : गरवारे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ई-वीकमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि उद्योजकतेला नक्कीच वाव मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केला.

Advertisement

गरवारे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातात उपस्थित मान्यवर.

Advertisement

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील आंत्रप्रेन्युअरशीप, इन्क्युबेशन अँड स्टार्टअप सेलतर्फे ई-वीकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बिझेनस एक्झिबिशनचे उद्घाटन डॉ. शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, नियमक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement


प्रदर्शनाच्या प्रत्यक्ष मांडणीबरोबरच आभासी प्रदर्शन मांडणीचा वापर उद्योजकता वाढविण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. शिकारपूर यांनी या वेळी केले.
नव्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी स्वतःचे उद्योग स्थापन करावेत या भूमिकेतून ई-वीक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Advertisement

ई-वीकमध्ये व्यवसायाच्या नवनवीन संकल्पना, ब्रँडींग इत्यादी विषयांवर आंतरमहाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Advertisement

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org