Marathi FM Radio
Saturday, January 25, 2025

पुरुषोत्तम‌’ची महाअंतिम फेरी 27 ते 29 डिसेंबर दरम्यान !!

Subscribe Button
‌गोल्डन आय न्यूज नेटवर्क

‘पुरुषोत्तम‌’ची महाअंतिम फेरी 27 ते 29 डिसेंबर दरम्यान !

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. 27 डिसेंबर ते रविवार, दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे.

Advertisement

पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोकृष्ट प्रायोगिक अशा प्रत्यकी चार एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे.

Advertisement

महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

महाअंतिम फेरीत पोहोचलेले संघ :
पुणे विभाग : म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. 1532), विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी), न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर (देखावा), म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा).

Advertisement

अमरावती विभाग : श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय), श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), प्रादेशिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन),

Advertisement

रत्नागिरी विभाग : आठल्य, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1), सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त), फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन),

कोल्हापूर विभाग : शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375), राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?), डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान), देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)

संभाजीनगर : (संभाजीनगर विभागाची स्पर्धा दि. 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत होत असून त्यातून निवडलेले चार संघ महाअंतिम फेरीत सादरीकरण करणार आहेत.)

: स्पर्धेची तिकीटविक्री ऑनलाईनही :

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांना तिकिट खिडकीद्वारे आपले तिकीट सुनिश्चित करता येणार आहे. सिझन तिकीट 500/- रुपये असून दैनंदिन (एका सत्रासाठी) तिकीट 150/- रुपये आहे.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular