गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन शुक्रवारी !
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे शोभा गुर्टू स्मृती मैफलीचे आयोजन !!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे सुप्रसिद्ध गायिका, ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात प्रसिद्ध गायिका आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन होणार आहे.
आस्था शुक्ला
कार्यक्रम शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
आस्था शुक्ला यांना पार्थ ताराबादकर (तबला) आणि शुभदा आठवले (संवादिनी) साथसंगत करणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आस्था शुक्ला यांना त्यांच्या आई वीणा पाणी यांनी संगीत विश्वाची ओळख करून दिली. त्यानंतर आस्था यांनी कानपूर येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित काशिनाथ शंकर बोडस यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले.
गुरुंच्या अकाली निधनानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे पुढील शिक्षणास सुरुवात केली.
आस्था यांची उपशास्त्रीय संगीतातील रुची पाहून वीणा पाणी यांनी त्यांना ठुमरी गायनाची विशेष तालिम दिली.