गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ दीपक शिकारपूर लिखित 58 व्या नवउद्योजकांची यशोगाथा पुस्तक प्रकाशन समारंभ !!
पुणे : डॉ दिपक शिकारपूर लिखित एकविरा प्रकाशन प्रकाशित 58 व्या नवउद्योजकाची यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले .
हे पुस्तक तरुण उद्योजकांना समर्पित करण्यात आले आहे असे डॉ दीपक शिकरपूर यांनी सांगितले.
या पुस्तकाचे प्रकाशन परसिस्टंट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद देशपांडे आणि MCCIA चे माजी अध्यक्ष सुधीर मेहता ह्यांच्या हस्ते व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ रवींद्र आचार्य , एकविरा प्रकाशनचे संस्थापक भालचंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या पुस्तकांमध्ये 45 पेक्षाही जास्त मराठी तरुण उद्योजकांच्या गोष्टी छापल्या गेल्या आहेत.
तरुण मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर कशाप्रकारे सुरू करावा , त्यात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात याविषयीचे अतिशय उत्कृट मार्गदर्शन डॉ दीपक शिकारपूर यांनी या पुस्तकात केले आहे.
हे पुस्तक स्वतःचा उद्योग करणाऱ्या तरुणांना नक्कीच नवी दिशा दाखवेल असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले.