गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*द मॉडर्न एस्थेटच्या उपक्रमातून कार्टूनकलेला नवी दिशा*!!
चारुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्र कार्यशाळेचा भव्य शुभारंभ*!!
द मॉडर्न एस्थेट प्रस्तुत, व्हिनस ट्रेडर्स आयोजित आणि क्षितिज चव्हाण दिग्दर्शित व्यंगचित्र आणि वर्ण वैशिष्ट्य या कार्यशाळेचा काल भव्य शुभारंभ झाला. चिंटू फेम असलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीतली ही पहिलीच कार्यशाळा असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
*हाऊसफुल्ल प्रतिसाद:*
व्हिनस ट्रेडर्स च्या नव्या व्हिनस स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन तासांच्या कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्टून कलेतील मूलभूत टप्प्यांपासून ते चिंटू सारख्या एका व्यंगचित्राचे ठोस व्यक्तिमत्त्व घडविण्यापर्यंतच्या प्रवासाचा सखोल अभ्यास या कार्यशाळेत सहभागी कलाकारांना करता आला.
ब्रंच म्हणून पनीर पॅटीस सोबत चॉकलेट बाईट आणि पिझ्झा ह्या मेनूने एक आगळी वेगळी मज्जा ह्या कार्यशाळेला आणली. चारुहास पंडित यांनी त्यांच्या दीर्घ अनुभवातून काही अमूल्य टिपण्या दिल्या आणि यशस्वी कार्टून निर्मितीचे तंत्र शिकवले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला एका प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
*कार्यशाळेची यशस्वी आखणी केल्याबद्दल विशेष कौतुक:*
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या टीमचेही विशेष कौतुक केले गेले. ह्या कार्यशाळेची संकल्पना मांडणारे – द मॉडर्न एस्थेट चे अध्यक्ष क्षितिज चव्हाण यांच्यासोबत सहकारी: दर्शना देवकर-चव्हाण, सिमरन क्षत्रिय, हुतेज माने, छायाचित्रकार अनिकेत नाईक, तन्वी पंडित, सुरेंद्र करमचंदानी आणि प्रमोद करमचंदानी या सहकाऱ्यांनी कार्यशाळेच्या प्रत्येक पैलूची उत्तम आखणी केली व त्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यादगार ठरली.
*कार्टूनकलेच्या कार्यशाळेतून नवोदितांना उभारी:*
कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने चारुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्टून कला शिकण्याचा आनंद व्यक्त केला. हा उपक्रम केवळ कार्टून प्रेमींसाठीच नव्हे तर नवोदित कलाकार आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरला.
क्षितिज चव्हाण यांच्या द मॉडर्न एस्थेट सोबत व्हिनस ट्रेडर्स यांचा हा उपक्रम भविष्यातही अशाच विविध आणि नाविन्यपूर्ण कार्यशाळा घेण्याच्या दिशेने प्रेरित करणारा ठरेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.