गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘संस्कार यात्रा’ सांगीतिक कार्यक्रम रविवारी !!
पुणे : पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत संस्कारात वाढलेल्या प्रसिद्ध गायक संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत रचना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या रचनांवर आधारित ‘संस्कार यात्रा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात (रेणुका स्वरूप शाळेचे आवार) आयोजित करण्यात आला आहे. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे शास्त्रीय व उपशास्त्रीय रचना सादर करणार असून निवदेन डॉ. मानसी अरकडी यांचे आहे.
.अभिजित बारटक्के (तबला) उद्धव गोळे (पखवाज), ऋचा देशपांडे (संवादिनी), तुषार दीक्षित (की-बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य) साथसंगत करणार आहेत. मतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या सावली ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांची आहे.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संस्कारात वाढलेल्या पंडित हेमंत पेंडसे यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताद्वारे शंभरपेक्षा अधिक रचना संगीतबद्ध केल्या आहेत. ‘माझ्या सर्वच रचनांवर अभिषेकी बुवा, पंडित हळदणकर बुवांचे संस्कार आहेत, असे अभिमानाने सांगणारे पंडित पेंडसे गुरुंकडून मिळालेला सांगीतिक वारसा विद्यार्थ्यांवर संस्कारित करीत आहेत.
म्हणूनच या संस्कार यात्रेची ृंखला पूर्ण जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सावली ट्रस्टचे संचालक विद्वत ठकार यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.