‘शब्द-सुरांच्या काठावर’
शनिवारी गप्पा-गाण्याची मैफल !
पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, कवी मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर या प्रतिभावान लेखकांच्या तसेच स्वरचित रचनांबरोबरच गप्पा-गाण्यांची अनोखी मेजवानी ‘शब्द-सुरांच्या काठावर’ या मैफलीद्वारे रसिकांना अनुभवता येणार आहे.
सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवार, दि. 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे. अजरामर गीतांसह नव्या कोऱ्या रचना, लोभसवाण्या कविता अन् त्या मागील कहाण्या अशी ही काव्यसंगीताची मैफल कवयित्री रेश्मा कारखानीस आणि गायक राजेश दातार सादर करणार आहेत.
अमित जोशी, कुमार करंदीकर, राहुल श्रीवास्तव, रोहित कुलकर्णी साथसंगत करणार आहेत, अशी माहिती सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे राजेश दातार यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.
जाहिरात –
जाहिरात