Marathi FM Radio
Thursday, December 12, 2024

सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ विषयावर व्याख्यान स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा उपक्रम !!

Subscribe Button
गोल्डन आय न्युज नेटवर्क

स्वातंत्र्यानंतरही हिंदुस्थानचा समृद्ध इतिहास दडविला गेला : शरद पोंक्षे

‌‘सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ विषयावर व्याख्यान
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा उपक्रम !!

स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिकेचे प्रकाशन !!

पिंपरी : विश्व रानटी अवस्थेत जगत असताना सुसंस्कृत जीवनपद्धती जगणारा देश अशी हिंदुस्थानची ओळख होती. आक्रमणकर्त्यांमुळे हिंदू संस्कृतीची मोडतोड झाली. इंग्रजांच्या राजवटीत देशवासीयांना मानसिक, बौद्धिक पातळीवर दुबळे बनविले गेले. हिंदुस्थानची समृद्ध संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही दडपली गेली. हिंदूंनो आता तरी जावे व्हा, निदान स्वातंत्र्यानंतरचा इतिहास तरी वाचा त्यातून देशाचे वाटोळे कुणी केले हे तरी समजेल, असे परखड प्रतिपादन सावरकर अभ्यासक, चतुरस्र अभिनेते, लेखक शरद पोंक्षे यांनी केले.

Advertisement

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) नेहा गाडगीळ, विक्रम दिवाण, शरद पोंक्षे, श्रीनिवास कुलकर्णी, अतुल रेवाणीकर, शितल कापशीकर.

Advertisement

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे ‌‘सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ या विषयावर आयोजित व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. निगडी प्राधिकरणातील मनोहर वाढोकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात सावरकर साहित्य अभ्यासक, वक्ते अक्षय जोग यांची प्रमुख उपस्थिती होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, विक्रम दिवाण, कृष्णा वैद्य, अतुल रेवाणीकर मंचावर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिज्वाला या दिनदर्शिकेचे प्रकाशन या वेळी पोंक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचा पदवितरण सोहळा या प्रसंगी झाला त्यात अमित सबनीस (ठाणे शहराध्यक्ष), आदीश जोशी (ठाणे शहर कार्याध्यक्ष), विदुला शेट्टीगार (अंबरनाथ शहर प्रमुख), श्री. वर्बे (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांना पद बहाल करण्यात आले.

Advertisement

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‌‘सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ या विषयावर बोलताना शरद पोंक्षे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुस्थानी मानून आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वेचले, असे नमूद करून शरद पोंक्षे म्हणाले, देशाचा वैभवशाली इतिहास शिक्षणपद्धतीत असावा यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रही होते. पण इतिहासाची मोडतोड करून इतिहास शिकविला गेला. इतिहासात कुणाला रस नाही, संस्कृतीविषयी अभिमान नाही असे असताना भविष्य ठरविणार कसे? इतिहास वाचा कारण इतिहास भविष्य ठरवायला मदत करतो असे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगत असत. आजही सरस्वतीचा अपमान होत आहे, हे विसरून कसे चालेल? राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा, राष्ट्रासाठी खारीचा वाटा उचला, असे आवाहन पोंक्षे यांनी केले.

Advertisement


अक्षय जोग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाविषयी विवेचन केले.

प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर विविध देशांमध्ये पोहोचली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. मान्यवरांचा परिचय सागर बर्वे यांनी करून दिला तर आभार सौरभ दुराफे यांनी मानले. सूत्रसंचालन शितल कापशीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद सराफ, चैतन्य कुलकर्णी, केदार भातलवंडे, रमाकांत जोग, संदीप गद्रे यांनी परिश्रम घेतले.

__________________________________________________

 

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org