
पुणे : भारतात राहणाऱ्या तसेच परदेशात राहूनही आपली मराठी भाषा, संस्कृती आणि ऋणानुबंध जोपासणाऱ्या मराठी कुटुंबियांसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ‘अनुबंध‘ या अभिनव व्हिडिओ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या अध्यक्ष स्वाती मुळे आणि सेक्रेटरी संगीता काकडे यांनी दिली. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटजतर्फे गेल्या वर्षी परदेशातील मराठी लहान मुलांसाठी काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना भरघोस प्रतिसाद मिळाला.
या वर्षीही देशातील तसेच परदेशातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिली स्पर्धा आहे मराठी अभिवाचन स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची 12 वर्षे पूर्ण केलेले असावे. सादरीकरणासाठी 5 ते 7 मिनिटांचा वेळ असून कथा, नाट्य-उतारा, लेख, कादंबरी-उतारा यापैकी एकाचे वाचन करणे अपेक्षित आहे.
दुसरी स्पर्धा आहे मराठी सुगम संगीत. या स्पर्धेत भक्ती गीते, भाव गीते सादर करता येणार आहेत. गीत करावेकर म्हणता येणार आहे. 5 वर्षांवरील पुढील व्यक्तीला या स्पर्धेत सहभागी होता येणार असून सादरीकरणाचा वेळ 3 ते 4 मिनिटे आहे.
मराठी कविता सादरीकरण स्पर्धेत स्पर्धकाला विषयाचे बंधन नाही. कोणतीही कविता सादर करता येणार आहे. स्पर्धेसाठी 3 ते 4 मिनिटे वेळ असून 5 वर्षांपुढील व्यक्तीला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धकांना कितीही स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच एकाच स्पर्धेत कितीही प्रवेशिका देता येणार आहेत.
प्रत्येक प्रवेशिकेसाठी प्रवेश मूल्य 300/- रुपये आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपला व्हिडिओ एमपी4 या फॉरमॅटमध्ये rcphanubandh@gmail.com या मेल आयडीवर पाठवायचा आहे.
स्पर्धकांनी आपला व्हिडीओ आणि प्रवेश देणगी मूल्य 15 मे 2023 पर्यंत पाठवायचे आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धांचे संयोजक अविनाश ओगले (+919373764247), लीना गोगटे (+919823256662) यांच्याशी संपर्क साधावा.
प्रवेश फीच्या माध्यमातून जमा होणारा निधी गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या अध्यक्ष स्वाती मुळे आणि सेक्रेटरी संगीता काकडे यांनी केले आहे.
जाहिरात – Pl Click on Image for more details
जाहिरात