गोल्डन आय न्यूज नेटवर्क , रिपोर्टर आत्माराम ढेकळे
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन स्त्री शक्ती फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी ‘फॕशन शो २०२३’चे आयोजन करण्यात आले होते.
लहान मुलांचा व महिलांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमांस उत्फुर्त प्रतिसाद मिळाला .
या फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार यांनी या आगळ्या वेगळ्या फॕशन शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये किड..मिस, मिसेस मध्ये महिला सहित लहान मुलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. सर्वांनी खुप छान प्रतिसाद दिला.
या सर्वांमधुन टाॕप अकरा मेंबर्स निवडण्यात आले व लहान मुलांमधुन सहा निवडण्यात आले. पहिला राउंड ट्रॕडिशनल राऊंड (सांस्कृतिक ) फेरीचा होता. यामध्ये प्रामुख्याने अनेकांनी विविध प्रदेशातील वेशभुषा केली होती. त्यामध्ये इंडियन , केरळ, बंगाल, महाराष्ट्र , राजस्थान, गुजरात , पंजाब, मणिपुरआदी प्रदेशातील पारंपारिक आकर्षक वेशभुषा आपली संस्कृती जपत महिलांनी पहिली फेरी स्वतःचा परिचय देत अत्यंत खुप सुंदर सादर केली.
दुसऱ्या फेरीमध्येही त्यांनी आपली कमाल दाखविली, सर्वांनी वेस्टर्न पेहराव करुन..ज्युरीनी विचारलेल्या प्रश्नांना या सर्वांनी खुप छान उत्तरे दिली. यामध्ये विनर…होती सौ.शुभी भट तर फर्स्ट रणरप म्हणुन सौ.प्रतिभा मुंढे आणि सेकंड रणरप सौ.नीलम सोनवणे यांना घोषित करण्यात आले.
यामध्ये बेस्ट काॕस्च्युम – सौ.छंदिता मंडल, बेस्ट टॕलेन्ट- सौ.शितल मंदानेकर, बेस्ट काॕन्फिडन्स-सौ.रेणुका पांचाळ, बेस्ट स्माईल- सौ.अमिना सय्यद, बेस्ट आइज-सौ.श्वेता पाटील, फोटोजनिक फेस-सौ.हेमांगी बारावकर, बेस्ट हेअर स्टाईलअॕन्ड चार्मिंग पर्सनाॕलिटी- सौ.वैशाली जाधव तर मिसेस ग्लोरीयस- सौ.सारिका दिवे यांना पुरस्कृत करण्यात आले.
या फॕशन शो मध्ये कोरिओग्राफर सौ.करुणा मिस्त्री , ग्रुमिंग सौ.संगीता पार्टे, ज्युरी कु.श्वेता शेळके, सौ.सारिका चव्हाण यांनीही खुप छान सहकार्य केले.
तसेच या शोचे निवेदन सौ.सविता शेळके, सौ.अर्चना वायदंडे यांनी उत्कृष्ट केले. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये विनर-कु.भावना आखाडे, फर्स्ट रनरप- कु.ओवी घडशी तर सेंकड रनरप – कु.प्रसाद तडके यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी महापौर सौ.मंगलाताई कदम, एबीएसएस व्हीएसएसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.पुष्पाताई सोनार, निर्वाण दिव्यांग संस्थेच्या सौ.ज्योतीताई आघारकर, कवियत्री लेखिकासौ, शामलाताई पंडीत, सुरभी पतसंस्थेच्या सौ.ललिताताई पवारआदी उपस्थित होते.
या संपुर्ण कार्यक्रमाचे संयोजन योगगुरु सौ.अर्चनाताई सोनार यांनी उत्तम प्रकारे सांभाळले.
जाहिरात