गोल्डन आय न्यूज नेटवर्क , रिपोर्टर आत्माराम ढेकळे
पुणेः येथील स्त्री शक्ती फाउंडेशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विनामुल्य आॕनलाईन विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड भागातील बहुउद्देशीय सभागृहात स्त्री शक्ती फाउंडेशन च्या वतीने विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पक्षरुढनेता एकनाथदादा पवार, साहित्यिक लेखक वि.दा.पिंगळे, प्रोफेसर ईश्वर सोनार, रुग्वेद टुडे न्यूजचे संचालक दिनेश येवले, सहसंचालक व पत्रकार आत्माराम ढेकळे, लेखक कवि सुभाष चव्हाण, वधु-वर सुचक मंडळाचे मोहन घोडनदीकर, सामाजिक कार्यकर्ते आशिष बागुल, काॕन्ट्रॕक्टर संतोष ठाकुर, सन्मित्र युवक मंडळाचे योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये योगगुरु अर्चनाताई सोनार यांच्या संकल्पनेतील सौ.रेखा महिंद्रकर यांनी लेखन केलेल्या नाटिकेचे सादरीकरण उत्तम करण्यात आले. यामध्ये सौ.प्रतिभा गुरव, सौ.कविता भांडारकर, सौ.तनुजा राऊत तर प्रमुख भुमिकेत सौ.श्रुती देसाई यांचा सहभाग होता. या सर्वांनी उत्कृष्ट अभिनय केला.
तसेच अध्यात्मिक बाल संस्कार केंद्राच्या मुलांनीही ॐनमो शिवाय चा जप करीत ‘अच्युतम केशवम…या गीतावर बहारदार नृत्य करुन हिंदु संस्कृतीची जोपासना केली.
याप्रसंगी लहान मुलांनी बनविलेल्या चाॕकलेटच्या बंगल्याचे कलाकृत्तीचे सर्वांनी कौतुक केले. प्रामुख्याने या फाउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार यांनी आयोजित केलेल्या महिला दिना निमित्त महिलांसाठी धावणे, क्रिकेट मॕच, चमचा लिंबु, दोरीवरील उडी, बुध्दीमत्ता चाचणी , सोयाबीन काॕईन अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच वर्षभर छान स्वंयसेवी वृतीने समाजकार्य करणाऱ्या महिलांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ.मीतांजलीताई मोहिते यांनी केले.
योगगुरु सौ.अर्चनाताई सोनार यांच्या कार्यक्रम आयोजनाबद्दल व महिलांना संघटीत करुन त्यांचा सन्मान करीत असल्याबद्दल ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी त्यांचे कौतुक करुन कार्यक्रमासाठी संदेशद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या.
जाहिरात