ललित लेखन:
कॉफी विथ गझल☕
“ऐक ना गं….कॉफी करतोय
दोन मिनिटात होईल ….फार वेळ नाही लागणार बस ना दोन मिनटं”….असं म्हणत म्हणतच तो किचनमध्ये गेला तीही पाठोपाठ त्याच्या मागे “नको रे उशीर होतोय…उद्या टेस्ट आहे कॉलेजमध्ये, अभ्यास व्हायचाय रे अजून” असं म्हणत त्याच्या मागे गेली….”दोन मिनीटांनी असा काही उशीर बिशिर नाही होत गं” एकीकडे असा आर्जव करत असताना त्याने कॉफीसाठी आधणही ठेवलं त्याच्या इतक्या प्रेमळ आग्रहाखातर तीही थांबली….मनातून तिलाही तेच हवं होतं…
****
ती फर्स्ट इयर ला आणि तो लास्ट इयरला दोघेही एकाच कॉलेजला आणि एकाच सोसायटीत राहायला…दोन्ही कुटुंबही एकमेकांच्या चांगलीच परिचयाची…दोघांमध्ये लहानपणापासूनच चांगली मैत्री होती…ती दिसायला सुंदर,गोरीपान आणि आकर्षक आणि वागणंही गोड… तोही उंच आणि सावळा पण स्वभावाने मृदुभाषी आणि आज्ञाधारक असा…मनातून तिलाही तो खूप आवडायचा…आणि त्यालाही ती..
****
त्याने कॉफी साठी आधण ठेवलं आणि तेव्हड्यात स्टडी रूममध्ये चालू आसलेल्या रेडिओ वर जगजीत सिंग चं ते गाणं लागलं
“झुकी झुकीसी नजर…बेकरार है के नही”
आणि एकमेकांची नजरानजर झाली
तीही थोडीशी लाजलीच आणि खरंच तिची नजर तिने झुकवली….तिलाही तो खूप आवडायचा मनातून पण कधी सांगू शकली न्हवती….
“दबा दबासा सही दिलमे प्यार है के नही”…..
हे ऐकताच त्यानेही तिच्याकडे पाहिलं आणि नजरेनेच त्याने जणू तिला विचारलं “हो ना?”….
ती शांतपणे गाणं ऐकण्यात रमली होती पण नजरेच्या कोपर्यातून त्याचं तिच्याकडे बघणं तिलाही जाणवलंच होतं….
त्याने कॉफीचा मग तिच्या हातात देताना हळूच त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना झाला आणि ती शहारली
“तू अपने दिलकी जवा धडकनोको गिनके बता…. मेरी तऱ्हा तेरा दिल बेकरार है के नहीं…
दबा दबासा सही…. दिलमे प्यार है के नहीं”
एव्हाना तिच्याही हृदयाची धडधड अक्षरशः वाढली होती…तिच्या चेहऱ्यावर ती त्याला स्पष्ट दिसू लागली होती….
“वो पलके जीसमे मोहबत जवान होती है….उस एक पल का तुझे इंतजार है के नहीं….दबा दबासा सही दिलमे प्यार है के नहीं”
त्यानेसुद्धा बऱ्याच दिवसांनी आज हिम्मत करून तिच्यावर त्याची प्रेमळ नजर रोखून धरली होती…
“‘तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हु दुनिया को…
तुझेभी अपनेपे ये ऐतबार है के नहीं…
दबा दबासा सही दिलमे प्यार है के नहीं”
एव्हाना तिनेही लाजून नजरेनेच त्याला स्वतःचा होकार कळवला आणि अक्षरशः लाजून गुलाबी झालेला तिने स्वतःचा चेहरा दोन्ही हातानी लपवला…
अत्ता जगजितसिंग ह्यांची दुसरी गझल सुरू झाली होती…
“होठोसे छुलो तुम…मेरा गीत अमर कर दो…”
आणि वातावरण गुलाबी झालं💗💕
प्रीती🌹
©Preeti✍️
प्रीती जोशी
Mob no 8208389941
A1/12 krushnaleela terrace
Kothrud
जाहिरात