रिपोर्टर – प्रसन्न पाध्ये
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 12 संघांचा सहभाग दोन दिवसात खेळले गेले 31 रोमांचक सामने
पुणे : जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन (जे.सी.ए.एफ.) पुणे विभाग आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत एसव्हीएस लायन्स संघाने एमजीएम ब्लास्टर्स संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
जे.सी.ए.एफ.तर्फे यशवंत स्पोर्ट्स टर्फ बिबवेवाडी येथे या रोमांचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 12 संघ मिळून 123 चार्टर्ड अकाऊंटंट्सचा स्पर्धेत सहभाग होता. दोन दिवसात एकूण 31 सामने खेळले गेले.
संस्थेचे 700 पेक्षा जास्त सदस्य असून फेडरेशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष संतोष दोषी, जनरल सेक्रेटरी महावीर चानोदिया, खजिनदार प्रमोद गुगळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कामकाज यशस्वीपणे सुरू आहे. सदस्यांचे संघटन, आरोग्यदायी जीवनशैली यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते. याच हेतूने फेडरेशनच्या पुणे विभागाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नमोहन ग्रुपचे संचालक लक्ष्मीकांत खाबिया यांच्या हस्ते झाले. अटितटीची लढत देत सामने खेळले गेले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निपुण भंडारी (सर्वोत्कृष्ट फलंदाज), कल्पक मसालिया (सर्वोत्कृष्ट गोलंदाज), शिल्पा मुनोत (सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू) यांचा गौरव करण्यात आला. निपुण भंडारी यांनी मालिकावीर हा किताबही पटकाविला.
समारोप समारंभासाठी सिद्धीविनायक ग्रुपचे राजेशकुमार सांकला तसेच जेसीएएफ अॅपेक्स, मुंबईचे प्रतिनिधी मुकेश सोळंकी, अशोककुमार पगारिया, जैन महासंघाचे अध्यक्ष हरीश भाई शहा, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर लुणिया यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सिद्धिविनायक ग्रुप, सुखवानी स्कायलाइन आणि रत्नमोहन ग्रुपचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
जे.सी.ए.एफ. च्या सदस्यांनी एकत्र यावे, त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडावे तसेच एकामेकांमधील संवाद वाढीस लागावा या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे जे.सी.ए.एफ. पुणेचे जनरल सेक्रेटरी महावीर चानोदिया यांनी या प्रसंगी सांगितले. सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात अनेक उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी सांगितले.
संघटनेचे प्रसाद राठोड, मुकेश जैन, अक्षय ओसवाल, सृष्टी ओसवाल, आकाश मेहता, मनीष पितळे यांचे स्पर्धेच्या आयोजनात सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या आयोजनात सिद्धिविनायक ग्रुप, सुखवानी स्कायलाइन आणि रत्नमोहन ग्रुप यांचे सहकार्य लाभले.
जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन (जे.सी.ए.एफ.) पुणे विभाग आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील एसव्हीएस लायन्स या विजेत्या संघासमवेत उपस्थित मान्यवर.
जाहिरात