गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विकासकर्मी अभियंता मित्र पुणे, दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल सेंटर आणि फेरोसिमेंट इंडिया आयोजित परिसंवाद !!
विषय –नवले पूल अपघात संपवू या ..
पूल, रस्त्यांचे नियोजन करताना आणि त्यांची बांधणी करताना राज्यकर्ते आणि अभियंत्यांचा मोठा सहभाग असतोच. परंतु आज अनेक वर्ष नवले पूल परिसरामध्ये अपघात होत आहेत. अपघात झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकाला पाच लाख रुपयांची मदत दिली जाते. शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये अशा पद्धतीने मृतांच्या नातेवाईकांना दिलासा म्हणून दिली आहे.

पण अपघात थांबले आहेत का? तर नाही!
याबाबतीत पुण्यातील जाणकार नागरिक , अभ्यासू अभियंते आणि वाहतूक विषयातले तज्ञ , सल्लागार, अजूनही मौन पाळून का आहेत?
अभियंते पर्यायवादी असतात. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर पर्याय असतो.
पुण्यामध्ये असे अभियंते नाहीत काय? त्यांना या प्रश्नावर उत्तर सापडत नाही काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आता मात्र मौन बाळगून चालणार नाही. ज्या ठिकाणी समाजाचे हित आहे किंवा चुकीचे प्रकल्प उभे राहत असतील अशा ठिकाणी निर्भीडपणे आपण बोलले पाहिजे. शासनकर्त्यांनी देखील ते ऐकण्याची गरज आहे.

आज गेली कित्येक वर्षे नवले ब्रिज आणि परिसर येथे अपघातांचे नियंत्रण करण्यात अपयश का येत आहे? जवाबदार कोण? ह्या विषयी आपण अजिबात बोलणार नाही.
पण काय सुधारणा केल्या पाहिजेत? हे आपण दोन भागात मांडणार आहोत.
1. अभियांत्रिकी सुधारणा.
2. प्रशासकीय सुधारणा
येत्या रविवारी दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता एका परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांनी तसेच अभियंत्यांनी आपल्या विधायक सूचना जरूर मांडाव्यात. प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
मात्र तुमच्या सूचना थोडक्यात 86528 45939 या मोबाइल क्रमांकावर व्हाट्स ॶॅप द्वारे दि. २० नोव्हेंबर २५ पूर्वी पाठवा. निवड झालेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष बोलण्याची संधी दिली जाईल. येथे मांडलेली मते आणि इतर सूचना या मासिकात प्रसिद्ध केल्या जातील.
हे मासिक संबंधित वरिष्ठ अधिकारी, सचिव ,मंत्री महोदय आणि अनेक निवृत्त अभियंत्यांकडे थेट जाते.
—————-
परिसंवादाचे ठिकाण :
दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स , पुणे. लोकल सेंटरचे काळे सभागृह.
वेळ: रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्या. ४ वाजता.











