गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त
भीमराव पाटोळे यांना साहित्यरत्न पुरस्कार !!
पुणे : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांचा साहित्यरत्न पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोहिनूर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत, अशी माहिती फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. माजी नगरसेविका लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.