गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब, कर्वेनगर अध्यक्षपदी नितीन महाजन यांची निवड !!
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे, कर्वेनगरच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली असून अध्यक्षपदी नितीन महाजन यांची निवड करण्यात आली आहे. 2025-26 या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मोठया आनंदात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आजी प्रांतपाल चारुचंद्र श्रोत्री , सह प्रांतपाल स्वाती मुळ्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्लबचे मावळते अध्यक्ष दीपक थिटे मंचावर होते.
दीपक थिटे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन महाजन यांच्याकडे सुपूर्त केली.
नूतन कार्यकारिणीत प्रभाकर वावगे (सेक्रेटरी), दीपक नानिवडेकर (ट्रेझरर), गौरी कुलकर्णी (डायरेक्टर मेंबरशीप), आशा आमोणकर (डायरेक्टर फाऊंडेशन , पोलिओ), शिरीष पुराणिक (डायरेक्टर पब्लिक इमेज व्होकेशनल), मिलिंद अग्निहोत्री (डायरेक्टर स्ट्रॅटेजीक प्लांनिंग ), डॉ दिलीप कुलकर्णी (डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट), अशोक बापट ( Sargent at Arms), शिरीष पुराणिक (जॉईंट सेक्रेटरी ), मृणाल खर्चे ( Environment) यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन महाजन म्हणाले रोटरी क्लब, कर्वेनगर च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यात आरोग्य, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात सर्वांना एकत्र घेऊन कार्य करण्याचा मानस आहे.
चारुचंद्र श्रोत्री यांनी रोटरी क्लब कर्वेनगर च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून नूतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
त्याच बरोबर ते म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. हवे असल्यास डिस्ट्रिक्ट चे सहकार्य घेऊन डिस्ट्रिक्ट चे प्रोजेक्ट घ्यावेत.
तसेच देणगीदार यांच्यातर्फे मिळणारी मदत गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी रोटरी क्लब कर्वेनगर सदैव जागरूक असतो. कामात पारदर्शकता राखून समाजकार्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी रोटरी क्लब, कर्वेनगर चे सदस्यत्व स्वीकारणार असल्याचे संदीप गाजरे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ अनुजा कुलकर्णी यांनी केले.