गोल्डन आय न्यूज नेटवर्क
फिनोलेक्स कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांचे Get together मोठ्या उत्साहात साजरे !!
फिनोलेक्स केबल्स या कंपनीमध्ये अनेक वर्षे जॉब केल्यानंतर रिटायर्ड झालेल्या अधिकाऱ्यांचे गेट-टुगेदर नुकतेच पुण्यातील किमया हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपापले अनुभव व आपल्या कार्यकाळात घडलेल्या अनेक घटनांवर व गमतीजमतींवर चर्चा करून आनंद साजरा केला.
बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह व कुतूहल दिसत होते.
बोलताना प्रत्येक जण मागील आठवणींना उजाळा देत होता व आपल्या कार्यकाळात घेऊन जात होता. यातील काही अधिकारी 75 वयापेक्षा जास्त वय असलेले देखील होते.
आपल्या आयुष्यातील महत्त्वाची बरीच वर्षे फिनोलेक्स कंपनीमध्ये काम केल्यानंतर व आता कंपनी मधून रिटायर्ड झाल्यानंतर अशाप्रकारे भेटून आनंद साजरा करत एकमेकांचे चांगलेच मित्र झालेले दिसत होते व ह्या प्रसंगी आपल्या आयुष्यातील सुखदुःखाच्या गोष्टींवर दिलखुलासपणे चर्चा करताना देखील दिसत होते.
ह्या प्रसंगी , आता यापुढे आपण सर्वजण वरचेवर भेटत राहू असा ठराव सर्वांनी केला व कार्यक्रमाची सांगता केली.