Marathi FM Radio
Sunday, July 20, 2025

नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चा समारोप : शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान !!

Subscribe Button

 

Advertisement
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

मानवी मेंदू तंत्रज्ञानापेक्षा कायम वरिष्ठच : शि. द. फडणीस !

‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चा समारोप : शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान !

पुणे : कला या संवाद साधणाऱ्या आहेत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, एआय ही सगळी टूल्स आहेत कला नव्हेत. मानवी मेंदू तंत्रज्ञानापेक्षा कायम वरिष्ठच आहे. सर्जनशीलता, सृजन तसेच भावना ही या तांत्रिक माध्यमातून कधीच साकारली जाणार नाही याचे भान ठेवून कलाकाराने पुढे जायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले.

Advertisement

सत्कार समारंभात डॉ. अनुपमा पाटील, मुरली लाहोटी, सुनील महाजन, शि. द. फडणीस, चंद्रमोहन कुलकर्णी, प्रा. राधाकृष्ण पाटील, प्रसाद मिरासदार, शारंगधर साठे

Advertisement

.संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचा समारोप आज (दि. 15) सायंकाळी शि. द. फडणीस यांच्या उपस्थित झाला. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisement

शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, शारंगधर साठे तसेच प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या प्राचार्य डॉ. अनुपमा पाटील, चित्रकार प्रा. राधाकृष्ण पाटील यांची उपस्थिती होती. या प्रसंगी फडणीस यांचा शाल, पुणेरी पगडी घालून चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Advertisement


शि. द. फडणीस पुढे म्हणाले, चित्रकला हे व्यक्त होण्याचे पहिले माध्यम असून त्यानंतर शिल्प, नृत्य, भाषा, संगीत असा कला प्रवास घडला आहे. माणसाने उपजिविकेसाठी कुठल्याही प्रांतात शिक्षण घेतले, करिअर केले तरी कायम एखादी कला जोपासावी कारण त्याच्या एकटेपणात कलाच कायम सोबत असते.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणक्रमाबरोबरच कला शिकता येणार आहे तसेच त्याचे गुण देखील मिळणार आहेत हा महत्त्वाचा बदल स्वागतार्ह आहे, असे फडणीस म्हणाले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रसाद मिरासदार यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार सुनील महाजन यांनी केला.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular