गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कर्तृत्ववान महिलांचा गणेश मंडळांनी केला सन्मान !!
पुणे : आत्मविश्वास आणि जिद्द बाळगून केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर यशोशिखर गाठणाऱ्या व इतरांना जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विविध गणेश मंडळांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार देऊन सन्मान केला.
अलंकार पोलीस स्टेशनमधील निरीक्षक सुनीता रोकडे, महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत. वुई पुणेकर संस्थेच्या आम्रपाली चव्हाण, अलंकार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोखेतील सुरेखा मोतीराम चव्हाण, अंगणवाडी सेविका अरुणा तोंडे यांना सन्मानित करण्यात आलो. तसेच होतकरू महिलांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाखा वेलणकर होत्या. वृषाली फडणवीस, रूपाली मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. द बेस स्टुडिओ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांमध्ये उपजतच अनेक गुण असतात. आव्हानांचा सामना करण्याची महिलांमध्ये ताकद असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या येतच असतात.
पण त्या अडचणींवर मात करून पुढे जायचे असते. यातूनच आयुष्याची नवी वाट सापडत असते. परिस्थितीसमोर हात न टेकता आव्हानांचा सामना करायला तयार रहा असा सल्ला आपआपल्या क्षेत्रात यशोखिशर गाठणाऱ्या महिलांनी उपस्थितांना दिला.
श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, गणेश नगर मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, कुमार युवक मंडळ, ओंकार मित्र मंडळ अखिल गणेश नगर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सूत्रसंचालन स्वामिनी पंडित, नीला कदम, अर्चना ननावरे यांनी केले.
जाहिरात