गोल्डन आय न्यूज नेटवर्क
फिनोलेक्स च्या माजी अधिकाऱ्यांचे अनोखे गेट-टुगेदर !
फिनोलेक्स केबल मध्ये काम करणारे अधिकारी यांनी रिटायरमेंट नंतर एकत्र येऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला.
यामध्ये विविध डिपार्टमेंट म्हणजेच परचेस , मार्केटिंग , प्रोडक्शन , मेंटेनन्स , अकाउंट्स , स्टोअर्स ते अगदी डिव्हिजन हेड असे अधिकारी उपस्थित होते.
या सर्वांनी मिळून पूर्वी आपण केलेल्या कामाच्या व त्यामध्ये आलेल्या बऱ्याच गमती जमती या विषयी आठवण काढून आपल्या फिनोलेक्स मधील प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
अधिकाऱ्यांमध्ये के डी शेनौय , पी एम देशपांडे , प्रशांत बेंद्रे , सुनील दीक्षित , एन बी साठे , प्रसाद शिवरकर , श्रीशैल गद्रे , विनोद परमार , चिपळूणकर , मेहेंदळे , सुहास जोशी , लोखंडे , रमेश सदलगी , व्ही आर देवरे , किरण पालकर , अशोक जोशी , मिलिंद दसरे , चारू गोडबोले इत्यादी मोठ्या उत्साहाने हजर होते.
यावेळी सर्व मित्रांनी एकमेकांविषयी आपुलकीने चौकशी केली व आपल्या रिटायर्ड आयुष्याविषयी माहिती दिली.
हे गेट-टुगेदर अतिशय उत्साहामध्ये पार पडले व असेच वरच्यावर भेटत राहू अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सर्वांनी एकमेकांना आरोग्यमय आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
जाहिरात