गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आम्ही सुखाची माणसं आहोत
नव्या पिढीच्या मनाला भिडणारा, अनुभवांची देवाणघेवाण करणारा आणि नात्यांमध्ये दडलेली अव्यक्त भावना प्रकट करणारा ‘आम्ही सुखाची माणसं आहोत’ हा कार्यक्रम रसिकांच्या मनात खोलवर रुजला.
या कार्यक्रमाची निर्मित ग्ली पतिसरी यांनी केलेली असून, पालखी – भारतीय हस्तकला हाट यांनी सहयोग दिला आहे आणि द मॉडर्न एस्थेट यांनी प्रस्तुत केला आहे.
या कार्यक्रमाचे कलाकार, सादरकर्ते आणि लेखक क्षितिज चव्हाण असून हा काव्य, शेरोशायरी आणि गप्पांचा चा कार्यक्रम आहे असे नावरूपास आले. क्षितिज चव्हाण यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाने भावनिक उंची गाठली. त्यांच्या लेखणीतून उमटलेली प्रत्येक ओळ रसिकांच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर स्मितहास्य एकाच वेळी उमटवत होती. श्रोत्यांना आपलेच अनुभव शब्दरूपात ऐकल्यासारखे वाटले असे कळते.
द बॉक्स, एरंडवणे येथे या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल पार पडला व कार्यक्रमाच्या अंती स्टँडिंग ओव्हेशन सुधा क्षितिज चव्हाण आणि त्यांच्या लेखणी ला मिळाले.
‘आम्ही सुखाची माणसं आहोत,
आमच्याकडे दुःख – सुखी होण्यासाठी येतं.
सुख पाहून आमचं – दुःख, सुखी होण्यासाठी आमचं थोडं सुख त्याच्या सोबत नेहतं.
कारण, आम्ही सुखाची माणसं आहोत;
आमच्याकडे दुःख – सुखी होण्यासाठी येतं.’
– क्षितिज चव्हाण
ही कल्पना प्रत्येक रसिकाच्या मनात उमजावी ह्या भावनेने रचलेला हा प्रेम, हृदयभंग आणि स्वानुभूती बद्दल बोलणारा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात कैक कलाकारांनी हजेरी लावली, अश्यात काही नावे म्हणजे चिंटू फेम ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, संगीतकार निखिल महामुनी, कवयत्री तनुजा चव्हाण, ज्येष्ठ अभिनेते नितीन धांडुके आणि स्वप्ना रत्नाळीकर – संस्थापक, संचालिका
रुख्मिणीदेवी कलाक्षेत्र हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सहायक मंडळी म्हणजे, छायाचित्रकार सूर्याक्षी कुर्डूकर, कार्यकर्ता सिमरन क्षत्रिय आणि हृगवेद विन्हेरकर आहेत.
कार्यक्रमा-अंती रसिकांनी चव्हाण यांचे मनमोकळे पणाने कौतुक केले, तर ग्ली पतिसरी यांनी सर्वांना एक स्मरणिका म्हणून ओट्स चे कोकोनट कुकीज, एग्ग्लेस व्हॅनिला ऑरेंज टी केक आणि रागी बाईट्स दिले.