गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ऋत्विक फाउंडेशनतर्फे रविवारी ‘स्वरानुभूती’अंतर्गत भारती प्रथाप यांचे गायन !
पुणे : ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे रविवारी (दि. 10) ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमाअंतर्गत चतुरस्र गायिका भारती प्रथाप यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ऋत्विक फाउंडेशनच्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे दिली.
मैफल सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेदभवन मागे, कोथरूड येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला) साथसंगत करणार आहेत. भारती प्रथाप यांना वयाच्या अवघ्या सातव्या वर्षीच त्यांच्या पालकांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली.
पुढे त्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीकडे वळल्या. पंडित मारुतीराव ईनामदार आणि पंडित राम राव नाईक या आग्रा घराण्याच्या दिग्गज गुरूंकडून त्यांनी गायकीचे शिक्षण घेतले.
भारती यांना एच. के. नारायण यांच्याकडून भावगीत आणि वाचन गायनाचे मार्गदर्शन लाभले आहे. भारती यांनी विदुषी ललित राव यांच्याकडून आग्रा-अत्रौली घराण्याची तालीम घेतली असून आग्रा घराण्यातील गायकीच्या विविध पैलूंचे मार्गदर्शन त्या आजही घेत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासह देश-विदेशातील अनेक महोत्सवांमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात