Marathi FM Radio
Wednesday, March 12, 2025

अनुवादातून भाषाज्ञान समृद्ध होते !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

अनुवादातून भाषाज्ञान समृद्ध होते

परिसंवाद : ‌‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‌’

छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : अनुवाद करणे ही सांस्कृतिक प्रक्रिया आहे, पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते. भाषांतर करताना सहित्यामधील मर्म किंवा भाव अनुवादित करणे सोपे नसते. भाषांतर करताना नवनवीन शब्दांचा वापर व्हावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद,

Advertisement

पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‌’ या विषयावर आज (दि. 23) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात प्रफुल्ल शिलेदार अध्यक्षस्थानी होते. डॉ पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, विजय नाईक, महामंडळ प्रतिनिधी किरण सागर यांचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement

मराठीतून इतर भाषेत किंवा अन्य भाषेतून मराठीत या विषयावरील परिसंवादात सहभागी (डावीकडून) विजय नाईक, दीपक बोरगावे, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. पृथ्विराज तौर, किरण सागर, सुनीता डागा

Advertisement

साहित्यकृतीचा अनुवाद करताना शब्दांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. भाषांतरात क्लिष्टता न आणता वाचकांना समजेल अशा पद्धतीने अनुवाद होणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत विजय नाईक यांनी व्यक्त केले.

Advertisement

ते पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याची भाषा आपले वैशिष्ट्य जपत असते. त्यातून उत्तम साहित्यकृतींची निर्मिती होते. त्यामुळे विपुल प्रमाणात अनुवादित साहित्य निर्माण करण्यासाठी त्या त्या भाषेतील साहित्यकृतींची उपलब्धता असणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते त्यातूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते.

दीपक बोरगावे म्हणाले, अनुवाद ही संस्कृती संक्रमणाची बाब आहे. अनुवाद करणे अवघड असले तरी ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज अनुवादित साहित्यकृतींना दुय्यम समजले जाते. या करीता अनुवादाबाबत नेमके मॉडेल तयार करण्याची गरज आहे. तसेच नवनवीन शब्दांचा वापर होणेही अपेक्षित आहे.


सुनीता डागा म्हणाल्या, साहित्यकृती विश्वव्यापी होण्यात अनुवादित साहित्याचा मोठा वाटा आहे. अनुवादकाला भाषेची जाण असणे आवश्यक आहे. अनुवादाच्या प्रक्रियेत लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये सतत चर्चा सुरू राहिली पाहिजे.

डॉ. पृथ्वीराज तौर म्हणाले, ज्ञानाचे चलन-वलन भाषेतून होत असते. अनुवाद हा भाषेला ज्ञानभाषा करण्याचे महत्त्वाचे काम करतो. मराठी भाषेत अनुवादाची परंपरा दीर्घ असून त्यात विविध शैली आहेत. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते.


परिसंवादाचा समारोप करताना प्रफुल्ल शिलेदार म्हणाले, प्रत्येक संमेलनात अनुवादित साहित्य या विषयावर चर्चा होणे तसेच अनुवादाच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. अनुवादित साहित्यासंदर्भात शासकीय स्तरावरही स्वतंत्र मंडळ व समिती तयार व्हायला हवी.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular