गोल्डन आय न्यूज नेटवर्क
१३ वा फेरोसिमेंट दिन – फेरोसिमेंट संरचना स्पर्धा पुरस्कार !!
पुणे, : दि. १२ फेब्रुवारी २०२५ –
पुण्यातील सुप्रसिद्ध अभियंता व्ही. डी. जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी १४ फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिवशी फेरोसिमेंट दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील फेरोसिमेंट संरचना स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी एक भव्य पुरस्कार वितरण समारंभ आर. एम. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय, वारजे, पुणे येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाला डॉ. व्ही. व्ही. दीक्षित (प्राचार्य, RMD सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रमुख वक्ते साताऱ्यातील आर्किटेक्ट अद्वैत पाटणकर हे फेरोसिमेंट तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याच्या पर्यावरणपूरक उपयोगांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
फेरोसिमेंट हे एक पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञान आहे जे पातळ पण मजबूत आणि टिकाऊ संरचना उभारण्यासाठी वापरले जाते.
भारतीय फेरोसिमेंट सोसायटीतर्फे दर वर्षी ही स्पर्धा नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात येते.
या वर्षी स्पर्धेतील विजेते:
· आर्किटेक्ट प्रियांका गोलसंगीमठ (हुबळी, कर्नाटक)
· आर्किटेक्ट संकेत घंटी (हुबळी, कर्नाटक)
· अभियंता के. आर. नाळे (पुणे, महाराष्ट्र)
स्पर्धेसाठी आर्किटेक्ट हेमंत साठे, अभियंता प्रकाश नागनाथ व आर्किटेक्ट अविनाश देखणे यांनी परीक्षण केले.
हा कार्यक्रम उद्योग तज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा असून, फेरोसिमेंटच्या भविष्यातील संधी व उपयोगांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.