गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘जावे त्या देशा’ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन !!
पुणे : झंकार स्टुडिओ प्रकाशित आणि मंदार काशीनाथ वाडेकर लिखित ‘जावे त्या देशा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सेवा भवन, सीडीएसएस जवळ, नळस्टॉप रस्ता येथे होणार असून पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखिका, वक्त्या शेफाली वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध उद्योजक राजेश मंडलिक यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे.
‘जावे त्या देशा’ या ऑडिओ बुक आणि ई-बुकचे प्रकाशनही या प्रसंगी होणार आहे.