गोल्डन आय न्युज नेटवर्क
उस्ताद उस्मान खान, पं. केशव गिंडे, पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. शिवदास देगलूरकर यांचामहामहोपाध्याय उपाधिने होणार सन्मान.
पुणे : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पुण्यातील उस्ताद उस्मान खान साहेब, ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि ज्येष्ठ गायक पं. शिवदास देगलूरकर यांचा महामहोपाध्याय या उपाधिने सन्मान करण्यात येणार आहे.
अभिजात भारतीय संगीताचा देशविदेशात प्रचार व प्रसार करणारे अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे संस्थापक पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे अखिल भारतीय पातळीवर 151 कलाकारांना निरनिराळ्या उपाधिने सन्मानित करण्यात येणार आहे.
पंडित राजन कुलकर्णी यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत रत्न पुरस्कार व पंडित आनंद गोडसे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि.19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता मराठी साहित्य संघ, नवी मुंबई वाशी येथे होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी दिली.
जाहिरात