गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘‘मॉम इंडिया’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त.मोहनकुमार भंडारी यांच्या अल्बमचे मंगळवारी प्रकाशन!!
अशोककुमार सराफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव.
पुणे : वाद्यवृंद क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे नाव म्हणजे ‘मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुप! पाच दशकांची वाटचाल पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने दि. 15 ऑगस्ट रोजी मॉम इंडियाचे संचालक मोहनकुमार भंडारी यांच्या स्वरचित ‘गोल्डल ज्युबिली’ या हिंदी गीतांच्या अल्बमचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रम मंगळवार, दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘गोल्डन ज्युबिली’ या अल्बममधील गीते प्रसिद्ध गायक सोनू निगम, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, प्रतिभासिंग बाघेल, ऐश्वर्या, सुश्मिता आणि भाग्यश्री भंडारे यांनी गायलेली आहेत.
या कार्यक्रमात ‘मॉम इंडियाज सुहाना सफर ग्लोरिअस 50 इयर्स’ हा लघुपट प्रसारित केला जाणार आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेते, पार्श्वगायक सचिन पिळगांवकर आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोककुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शुभम-सौरभ, सॉवेरी वर्मा, जितेंद्र कुलकर्णी, गौतम बाफना, मुकेश देढीया, विवेक परांजपे, पवन लढा, महेंद्र गणपुले, गोपाळ भाटिया, प्रमोद लाळे, प्रशांत चेंडके यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
————————————————————————-
जाहिरात