गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे वसुंधरा फाउंडेशन या संस्थेला सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कार !
पुणे : वसुंधरा फाउंडेशन या संस्थेला 2024 चा सर्वात्कृष्ट संस्था म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आले!या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक श्याम भुर्के व सामाजिक कार्यकर्ते क्रीडाभूषण राजेंद्र बडदरे होते.
सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुषमा कोंडे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
वसुंधरा फाउंडेशन संस्थेला 2024 चा सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कार प्रदान करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाची सुरुवात बासरी वादनाने झाली.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मंडळींना गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.ह्या कार्यक्रमात वसुंधरा फाउंडेशन या संस्थेला 2024 चा सर्वोत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वसुंधरा फाउंडेशन संस्थेने विविध सामाजिक कार्यक्रम उत्तम प्रकारे राबविले असून त्यातीलच काही जसे की गोरगरिबांना फराळ व कपडे वाटप , मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण इत्यादी.
हा पुरस्कार वसुंधरा फाउंडेशन चे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारला.
या प्रसंगी वसुंधरा फाउंडेशन चे कार्यकारी मंडळ व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.