Marathi FM Radio
Friday, March 13, 2026

सद्गुरु विश्वनाथबाबा यांचा प्रतिष्ठापना दिन उत्साहात संपन्न !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

सद्गुरु विश्वनाथबाबा यांचा प्रतिष्ठापना दिन उत्साहात संपन्न
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पुणे (प्रतिनिधी) – येथील गंगाधाम परिसरातील ॐसाई नरेंद्र या वास्तुमधील सद्गुरु श्री विश्वनाथबाबा यांचा सातवा प्रतिष्ठापना दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन संपन्न करण्यात आला. याप्रसंगी भाविकभक्त ,सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसादाचा लाभ या सर्वांनी घेतला.

गंगाधाम परिसरातील “ॐसाई नरेंद्र” येथे सद्गुरु श्री विश्वनाथबाबा यांच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्य भजन ,महाआरती ,भाविकांचे मनोगत,महाप्रसाद ,शेजआरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement

भाविक ,सेवेकरी यांनी सद्गुरु विश्वनाथबाबा मुर्ती,सद्गुरु संतनाथबाबा पादुका समाधी यांचे दर्शन घेऊन गुरुमाऊली श्रीमती नीताजी संतोष रांका यांचे आशिर्वाद घेतले.याप्रसंगी भाविकांचे मनोगत मध्ये पत्रकार आत्माराम ढेकळे व सरपंच शशिकांत मोरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.यामध्ये ते म्हणाले की,धार्मिक,अध्यात्म क्षेत्रात श्रध्दा असणे तितकेच आवश्यक असते.

Advertisement

Advertisement

त्यानुसार अनुभूतीचा प्रत्यय नक्कीच येतो.येथील ‘ ॐसाई विश्व संत दरबार ‘येथे यापुढे समस्यापुर्तीसह प्रबोधन,मार्गदर्शन होईल.भाविकांनी येथील गुरुवारच्या आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने येत जावे.तसेच सामाजिक कार्यक्रमातुनच या ‘सत्संग दरबार ‘चा विकास करणे आहे.त्यास आमचे सदोदित सहकार्य असेल.असे त्यांनी यावेळी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले

Advertisement

.भजन कार्यक्रमात शिवसहायसिंह बनारसवाले ,ज्ञानंदर पासवान यांनी सहभाग घेऊन मनमोहक सादरीकरणास साथ दिली.या प्रतिष्ठापना दिनी सद्गुरु विश्वनाथबाबा मंदिराची आकर्षक सजावट नितिन पेठारे,मुकेश पासवान साई गजरे यांनी केली.तर शिवलिंगाची सजावट साई सुर्वे यांनी केली.

विविध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने लवकुश गुप्ता उर्फ एलके ,साईराज रांका,प्रणव रांका ,महादेव जाधव ,राज खोल्लम यांनी परिश्रम घेतले.महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. शेवटी शेजआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular