गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वसुंधरा फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार शुक्रवारी !!
वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमींचा ही होणार सत्कार !!
पुणे : वसुंधरा फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन दिन सोहळा तसेच वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींचा सन्मान सोहळा शुक्रवार, दि. 14 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळात एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. वृक्षप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमींचा सन्मान वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय माणिकराव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसिद्ध गायक राजेश दातार यांचा सुमधूर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
-–—–——————————————————-
जाहिरात