गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पर्यावरण दिनानिमित्त गंगोत्री होमस्तर्फे ‘आपली नदी आपली जबाबदारी’ विषयावर शुक्रवारी सेमिनार !!
पुणे : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गंगोत्री होमस्तर्फे शुक्रवारी ‘आपली नदी आपली जबाबदारी’ (‘अवर रिव्हर अवर रिस्पॉन्सिबिलीटी’) या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करणे ही आता काळाची गरज बनली आहे. तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ज्या योगे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होण्यास हातभार लागेल. या अनुषंगाने सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रात आणि पुनर्विकास या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गंगोत्री होमस् आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र शुक्रवार, दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता सेवा भवन, सीडीएसएस जवळ, एरंडवणे येथे होणार आहे. नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण करणे या जबाबदारीच्या भूमिकेतून हे समिनार होत आहे.
जीवित नदीच्या संस्थापक शैलजा देशपांडे या ‘नदी स्वच्छतेला घरापासून सुरुवात’ (‘क्लिनिंग रिव्हर्स फ्रॉम होम’) या विषयावर तर इन्व्हॉयर्नमेंटल क्लब ऑफ इंडियाचे चेअरमन आमोद घमंडे ‘गृहसंकुलांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया : फायदे आणि आव्हाने’ (‘वेस्ट वॉटर ट्रिटमेंट ॲट सोसायटीज् : ॲडव्हाटेंजेस ॲन्ड चॅलेजेंस’) या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात