गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दिलीपराज प्रकाशनतर्फे
‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन !!
पुणे : दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि दिलीप बर्वे लिखित ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ या विज्ञानविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता स्वामीकृपा हॉल, 4 कर्वे रोड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका अश्विनी धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.