गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संतनाथबाबाच्या कार्याची माहिती प्रत्येक कार्यक्रमातुन व्हावी .!!
पुणेः- येथील गंगाधाम परिसरातील साई विश्वनाथ दरबार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘गुरुपोर्णिमा’ साजरी करण्यात आली.याप्रसंगी संतनाथबाबांचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती प्रत्येक कार्यक्रमातुन व्हावी.असे भाविकांनी मनोगत व्यक्त करतांना प्रतिपादन केले.
साई विश्वनाथ दरबार येथे नेहमी वर्धापनदिन ,विश्वनाथबाबा व संतनाथबाबा यांची पुण्यतिथी आदी कार्यक्रमाचे आयोजन होते.यावर्षीच्या गुरुपोर्णिमा कार्यक्रमाचे औचित्य साधुन आयोजित कार्यक्रमात संतनाथबाबाची महती कथन करतांना अध्यात्म ज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे म्हणाले की,यापुढे येथील प्रत्येक कार्यक्रमात ज्यांना बाबांचा सहवास लाभला व दरबारमध्ये जे मार्गदर्शन व प्रचिती मिळाली त्यांनी आपल्या अनुभवातुन मनोगत व्यक्त करतांना कथन करावे,जेणेकरुन संतनाथबाबांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळेल.
अशा माहितीनुसार संग्रही पुस्तिका प्रकाशित करण्याचाही मनोदय व्यक्त केला.तर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोरे यांनी बाबांच्या सहवासामधील काही अनुभव सांगितले व हा वारसा प्रथेनुसार गुरुमाऊली आईमाता चालवित आहेत.तेंव्हा या दरबारमध्ये व आयोजित कार्यक्रमात सर्वांनी यापुढेही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आपल्या मनोगतातुन त्यांनी आवाहन केले.
गुरुपोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने संतनाथबाबा यांच्या पादुकाचे व गुरुमाऊली आईमाता श्रीमती नीताजी रांका तांचे भाविकांनी मनोभावे पाद्यपूजन केले.यानंतर दर्शन घेऊन भेटवस्तु स्वरुपात अनेक भाविकांनी गुरुःदक्षिणा अर्पण केली.या सर्वांना गुरुमाऊलींनी आशिर्वाद दिले.कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसहायसिंह बनारसवाले यांनी मनमोहक भजन सादर केले.
ढोल मृदंगाची साथ साईराज रांका यानी दिली.या कार्यक्रमात सद्गुरु विश्वनाथबाबा मुर्तीच्या ठिकाणी नितिन पेठारे यांनी शिरडी साईबाबा मंदिर सारखे आकर्षक हुबेहुब सजावट केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लवकुश उर्फ एल.के.गुप्ता ,साई सुर्वे ,साई गजरे,श्रेयश पाटोळे आदींनी परिश्रम घेतले.