गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना ‘संगणक साधना गौरव पुरस्कार’ जाहीर !!
पिंपरी-चिंचवड येथे दि. 24 रोजी आयोजित शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनात होणार वितरण !!
पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचा ‘संगणक साधना गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनात होणार आहे.
डॉ. दीपक शिकारपूर
संगणकाच्या आगमनापासून गेली तीनहून अधिक दशके मातृभाषेत डिजिटल साक्षरतेची कास धरलेले डॉ. दीपक शिकारपूर अनेक उपक्रम राबवत असतात. 54 पुस्तकांचे लेखन, अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणारे अभ्यासपूर्ण लेख, हजारो व्याख्याने, वैयक्तिक समुपदेशन, यूट्यूब चॅनेल, www.itcareercounselling.com (मोफत वेब पोर्टल) अशा विविध मार्गांनी ते युवा पिढी सक्षम व कौशल्यपूर्ण घडवू इच्छित आहेत.
त्यांच्या या प्रदीर्घ सातत्यपूर्ण कार्याची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने घेतली आहे. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहकार्याने प्रतिभा शैक्षणिक संकुल येथे दि. 24 रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन होत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य व मूल्यमापन’ या विषयावर डॉ. दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनात परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे.
जाहिरात