अभिनेत्री सुलेखा तळवलकरांच्या अस्मिता चित्र एक्टिंग अकॅडमी चा नाट्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांच्या अस्मिता चित्र एक्टिंग अकॅडमी तर्फे पुण्यात नाट्यमहोत्सव घेण्यात आला.
यामध्ये पुणे व मुंबई च्या विद्यार्थ्यांनी एकूण तीन एकांकिका सादर केल्या. या तीनही एकांकिका अतिशय उत्तम सादर करण्यात आल्या असे मत प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे नोंदवले.
नाट्यमहोत्सवामध्ये सादर केलेल्या एकांकिका !
1) एक्सचेंज ऑफर 2) सप्तपदीचे स्वयंवर
3)भाग्याच्या शोधात
एकांकिका दिग्दर्शक –
1) सुधन्वा पानसे 2) सुनील कदम 3) साहिल देसाई 4) मृण्मयी कुलकर्णी 5)देवांशी धामणकर
या कार्यक्रमाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना सुलेखा तळवळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मार्गदर्शनात सुलेखा तळवलकर यांनी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचे देखील कौतुक केले व आपल्या पाल्याच्या मागे खऱ्या अर्थाने आई-वडिलांचे प्रोत्साहन असणे गरजेचे आहे असे मत नोंदविले.
कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये सुलेखा तळवलकर , प्रसाद शिवरकर , वृषाल गुंजाळ , रंजना धराधर , सतीश धराधर , शामराव कुलकर्णी यांचा समावेश होता.
याप्रसंगी अस्मिता चित्र ॲक्टींग अकॅडमी मधून प्रशिक्षण घेऊन सिनेमे व टीव्ही मालिकांमध्ये यशस्वीपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अस्मिता चित्रच्या विश्वस्त रंजना धराधर यांनी अकॅडमी तर्फे सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम अतिशय सुंदर झाला असे मत उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केले.
___________________________________________
जाहिरात