गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानचा जिद्द पुरस्कार भूषण कटककर, मुक्ता भुजबले यांना जाहीर !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या जिद्द पुरस्कांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीच्या पुरस्कारासाठी सुवानीती फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू महिला, मुली, मुले, शाळा, मजूर वस्त्यांमध्ये जीवनोपयोगी वस्तू पुरविणारे भूषण कटककर आणि मुक्ता भुजबले यांची निवड करण्यात आली.
भूषण कटककर,
असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम मंगळवार, दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे.
मुक्ता भुजबले
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात डॉ. ज्योती रहाळकर, सीताराम नरके, दयानंद घोटकर, तनुजा चव्हाण, डॉ. दाक्षायणी पंडित, विजय सातपुते, मीना सातपुते, डॉ. राजश्री महाजनी, दीपक करंदीकर, भालचंद्र कोळपकर, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात