Marathi FM Radio
Sunday, April 20, 2025

रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ उपक्रमाचा शुभारंभ !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ उपक्रमाचा शुभारंभ

तरुणांनी पुढाकार घेतला तर नोकऱ्यांची निर्मिती शक्य : आनंद देशपांडे
कष्ट, कल्पकतेद्वारे ग्रामीण उद्योजकांना यशप्राप्ती : सत्यजित तांबे

पुणे : देशात कामांच्या संधी मुबलक आहेत; परंतु नोकऱ्यांची कमतरता आहे. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करूच शकत नाही. जेव्हा तरुण रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतील तेव्हाच नोकऱ्याही निर्माण होतील.

Advertisement

म्हणूनच युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात नेटाने, जिद्दिने आणि ऊर्जेने परिपूर्ण राहून कार्यरत होण्याची आवश्यकता आहे, असे ठाम प्रतिपादन पर्सिस्टंटचे संस्थापक संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी आज (दि.1) येथे केले.

Advertisement

Advertisement

“रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी लोगोचे अनावरण करताना (डावीकडून) सचिन ईटकर, गणेश निबे, सत्यजित तांबे, डॉ. आनंद देशपांडे, भारत गिते, सागर बाबर.

Advertisement

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उद्योजकांचे सक्षमीकरण करण्यासाठी कॉमसेन्स टेक्नॉलॉजिस्‌‍चे अध्यक्ष सागर बाबर व महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ या उपक्रमाचा शुभारंभ डॉ. देशपांडे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात या दोघांची प्रकट मुलाखत सागर बाबर यांनी घेतली.

डॉ. देशपांडे आणि तांबे यांनी उद्योजकता या विषयावर परखड मते मांडली. पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तरुणांचा तसेच युवा उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भारत गिते, निबे गु्रपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


आनंद देशपांडे म्हणाले की, उद्योगात येणाऱ्याला त्याच्या उत्पादनाची समाजाला अर्थात ग्राहकाला असलेली गरज आणि वैशिष्ट्य समजले पाहिजे. बाजारपेठेत उत्पादनाची गुणवत्ता उत्कृष्ट असली पाहिजे. वित्तीय व्यवस्थापन, ग्राहकांची मागणी आणि विक्री कौशल्यांचा सुयोग्य तऱ्हेने अवलंब केल्यास उद्योजकता प्रगत होईल.

ते म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून बाजारपेठेतील विक्रीच्या संधी, वित्तीय व्यवस्थापन याविषयी सखोल अभ्यास करून उद्योजक विविध क्षेत्रात यश संपादन करू शकतात. आजच्या काळात आपले कार्यक्षेत्र सतत बदलत ठेवणे आवश्यक आहे.

नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देण्याच्या संधींचा अवलंब करत तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नवउद्योजकांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. व्यवसायाविषयी अर्धवट ज्ञान आणि अपुरे शिक्षण असल्यास उद्योजकता क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकणार नाही.

छोट्या उद्योजकांशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. कॉर्पोरेट क्षेत्र आणि शासनाने एकत्रितरित्या वाटचाल केल्यास रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. ग्रामीण युवक प्रतिकूल परिस्थितीत कष्टाला न घाबरता तग धरून राहतो यामुळे उद्योजकता क्षेत्रात त्याला निश्चितच यशप्रप्ती होईल, असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.

झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ-मोठे उद्योजक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने नोकरीच्या संधी कमी होत आहेत. ग्रामीण भागातील युवा उद्योजकांकडे प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून यश मिळविण्याची अधिक जिद्द असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील युवकांना उद्योग सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या कल्पकतेला दिशा मिळेल.

नवउद्योजकांसाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध असून देखील कर्जपुरवठा होताना अनेक अडचणी येतात. यामागे उद्योजकांची मानसिकताच कारणीभूत ठरते. सरकारी योजनेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज फेडायचे नसते तर बुडवायचे असते ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे तांबे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सचिन ईटकर यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात सुधारणा होऊन ग्रामीण भागातील नवउद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’च्या स्थापनेमागची संकल्पना स्पष्ट केली.

या उपक्रमाविषयी माहिती देताना सागर बाबर म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त करावे या हेतूने या उपक्रमाची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील नवउद्योजकांच्या अडचणींचाही मागोवा घेतला जाणार आहे. शिक्षण, वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारापेठांतील संधी या चतु:सूत्रीची अवलंब करत संस्था कार्यरत राहणार आहे.

गणेश निबे आणि भारत गिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular