गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सतार वादक अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील लघुपटाचे शनिवारी स्क्रिनिंग !!
पुणे : दिग्गज सतार वादक व संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील ‘6-अ आकाश गंगा’ या लघुपटाचे स्क्रिनिंग व संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 13 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. लघुपटाची निर्मिती अन्नपूर्णा देवी फाउंडेशनने केली आहे.
अन्नपूर्णा देवी
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् , प्लॉट नं. 17, सर्व्हे नं. 77/2, वेद भवन मागे, कोथरूड येथे होणार आहे.
संवादात्मक कार्यक्रमात लघुपटाचे दिग्दर्शक निर्मल चंदर आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित नित्यानंद हल्दीपूर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
नावनोंदणीसाठी +91 7700967425 या क्रमांकार संपर्क साधावा, असे आवाहन ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
जाहिरात