गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची निवड !!
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे दरवर्षी घेण्यात येत असलेल्या रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
ॲड. प्रमोद आडकर,
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीचे औचित्य साधून दि. 1 ते दि. 7 फेब्रुवारी या कालावधीत रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभागातून होणारा महोत्सव महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर, पुणे येथे आयोजित केला जातो.
सचिन ईटकर
महोत्सवाअंतर्गत रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार, रमाईरत्न पुरस्कार तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
जाहिरात