गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रामरक्षेच्या प्रारंभाच्या चरणातील चौथी ओळ म्हणजे “अनुष्टुप् छंद: ।”. २८ ऑक्टोबर २००४ रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनाचा विषय हाच होता: “अनुष्टुप् छंद: ।”
व्याकरणात ‘छंद’ म्हटले की आपल्याला आठवतात काव्यरचनाप्रकार व त्यांचे वर्ग. रामरक्षा ही अनुष्टुप् छंदात लिहिली गेली आहे. परंतु व्याकरणातील ह्या अर्थापुरता ‘अनुष्टुप् छंद’ सीमित नाही, हे समजावून सांगताना बापू, या पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे जाऊन, ‘अनुष्टुप् छंदा’मागचे रहस्य, हा सर्वश्रेष्ठ छंद कसा, त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि श्रीरामाशी असलेले त्याचे अद्भुत नाते उलगडून दाखवतात.
त्याचबरोबर अनुष्टुप् छंदात रचलेले रामरक्षेसारखे स्तोत्रमंत्र म्हटल्याने साधकाला नेमका काय लाभ होतो, हेही सद्गुरु बापू समजावून सांगतात.
परमेश्वराची प्राप्ती करून देण्याची ताकद असणाऱ्या ह्या अनुष्टुप छंदाचा महिमा समजण्यासाठी, बापू पुढे संत ज्ञानेश्वर व संत चोखामेळा ह्या थोर संतांची सुंदर कथाही सांगतात.