गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘प्रशिल मित्र मंडळ वाचनालयास ग्रंथ भेट’
समाजसुधारकांची चरित्रं व विचारसाहित्यांचा समावेश !!
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम !!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने पुण्याच्या पूर्व भागातील तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्टच्या वतीने फुलगाव येथील ‘प्रशिल मित्र मंडळ वाचनालयास’ ग्रंथ भेट दिले.
म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फुलगाव येथील प्रशिल मित्र मंडळ वाचनालयास ग्रंथ भेट देताना ‘तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्ट’चे पदाधिकारी, प्रशिल वाचनालयाचे सभासद व परिसरातील वाचनप्रेमी
महात्मा फुले दांपत्याचे कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा, शाहीर अण्णाभाऊ साठे, छ. शाहू महाराज ते नामदेव ढसाळ, अमरशेख, दया पवार, नरेंद्र जाधव आदींच्या पुस्तकांसोबतच लहान मुलांना समजतील अशा थोरांच्या बोधकथा, गोष्टींचा समावेश असलेली पन्नास हजार रुपयांची अडीचशेहून अधिक पुस्तके याप्रसंगी भेट देण्यात आली.
सदर पुस्तके ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, डॉ. गिरीश ओक, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर, डॉ. संगीता बर्वे, सुरेश नातू, स्नेहा महाजन, प्रसाद भडसावळे यांच्या संग्रहातील तसेच ट्रस्टने जमा केलेल्या देणगी रक्कमेतून प्राप्त झाली. उपक्रमास व ग्रंथनिवडीस संदर्भतज्ज्ञ व ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्टचे संभाजी साळवे, भगवान धेंडे, रितेश ओव्हाळ, उत्तम साळवे, राजेश वंजारे, सुंदराबाई वंजारे व परिसरातील मुले उपस्थित होते.
पालीभाषा अभ्यासक रितेश ओव्हाळ, भगवान धेंडे व कैलास वंजारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.