गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कवियत्री सुनीता कपाळे /ओहळकर यांना ‘लोकसाहित्यिक पुरस्कार’*
—–सर्व स्तरातुन अभिनंदन व शुभेच्छा.
पुणे ः- राष्ट्रसेवा परिषद आणि मराठबोली या संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण समारंभ ‘ नुकताच संपन्न झाला.विविध पुरस्कारात कवियित्री सुनीता कपाळे /ओहळकर यांना”लोकसाहित्यिक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होऊन अनेकांनी अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सुनीता गोविंदराव कपाळे /ओहळकर यांना पुणे येथे मराठमोळी ,पुणे या संस्थेच्या वतीने “लोकसाहित्यिक पुरस्कार” या समारंभाच्या अध्यक्षा व राष्ट्रसेवा परिषद ,पुणे च्या अध्यक्षा सौ.तेजस्वी आमले यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवर प्राचार्य भाऊसाहेब मगर शिवाजी भापकर ,साहेबराव पवळे,सौ,प्रिया खैरे पाटील ,युवराज गरुड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या समारंभाच्या आयोजनात संस्थापक व मार्गदर्शक परमेश्वर उमरदंड यांनी मोलाचा सहभाग घेऊन सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन सचिन कुरकुटे यांनी सांभाळले.संत ज्ञानेश्वर सभागृह,मराठवाडा मित्र मंडळ काॕलेज ,डेक्कन ,पुणे येथे आयोजित केलैल्या या कार्यक्रमास प्रामुख्याने पुणे वैश्य सुवर्णकार समाजाच्या वतीने पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्याम पावटेकर व प्रसिद्ध पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी उपस्थिती दर्शवुन कवियित्री सुनिता कपाळे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी पुरस्कारार्थी सौ.कपाळे भारावुन गेल्या.व त्यांनी आपली महत्वपुर्ण आवर्जून उपस्थिती हाच माझा पुरस्कार आहे .असे समाधानकारक शब्दसुमनाने व्यक्त केले.छत्रपती संभाजीनगर,जालना ,बीड,पुणे ,नाशिक ,अकोला ,नाशिक आदी भागातील समाजातुन अनेकांनी विविध समुहाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या.